विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष नेहमीच सकारात्मक राहील..रणजीत देसाई
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
हुमरमळा विभागातील, प्राथमिक शिक्षण शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष नेहमीच सकारात्मक राहील," असे प्रतिपादन मा.जि.प.अध्यक्ष रणजीत देसाई यांनी हुमरमळा येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले.
येथील पडोसवाडी रामेश्वर विद्यामंदिर प्राथमिक शाळा तसेच तु.ल.देसाई विद्यालय बांधकोंड आदी शाळांमध्ये , भाजपा पक्षातर्फे नुकताच सदर कार्यक्रम करण्यात आला.
या वेळी रणजीत देसाई तसेच, मा.पं.स.सभापती संजय वेंगुर्लेकर, मा.पं.स.सदस्य संदेश नाईक, हुमरमळा नव निर्वाचित ग्राम पंचायत सदस्य ॠषीकेश (बारीष) उपाध्ये , विरेंद्र सावंत, सौ.प्रणिता परब, सौ.सोनाली देसाई, समिक्षा परब, सुमित केसरकर,शेखर परब, विकास माड्ये, तसेच बांधकोंड शाळा मुख्याध्यपक श्री. प्रकाश म्हापणकर आदी उपस्थित होते
.मुख्या .सौ.परब यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संजय वेंगुर्लेकर यांनी, हुमरमळा गावाच्या शैक्षणिक व सामाजिक गरजांच्या पूर्ततेसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले
.यावेळी, विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांवर समर्पक उत्तरे दिली. विद्यार्थी प्रेम परब यांने रणजीत देसाई यांचे स्केच (व्यक्तिचित्र) काढले. विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ, व बक्षिसे देण्यात आली.प्रस्थावना उपाध्ये यांनी केली तर, आभार शेखर परब यांनी मानले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments