सावडाव ग्रा .प.स्ट्रीटलाईटप्रकरणी महावितरणचे बोगस मूल्यांकन दाखले, पत्रे व शिक्के वापरण्यात आल्या प्रकरणी होणार पोलीसात तक्रार..
🟨 त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त: पोलिसांत तक्रार दाखल करणार
नवप्रभात NEWS/ कणकवली
सावडाव ग्रामपंचायतीकडून २०१७ ते २०२२ या कालावधीत झालेल्या स्ट्रीटलाईटप्रकरणी महावितरणचे बोगस मूल्यांकन दाखले, पत्रे व शिक्के वापरण्यात आल्या प्रकरणीचा चौकशी अहवाल महावितरणकडे प्राप्त झाला आहे. या प्राथमिक अहवालानुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
याप्रकरणी सावहाव येथील नयना सावंत यांनी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. ३ जानेवारी २०२४ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी माथाचत तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली असून त्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल, असे मोहिते यांनी सांगितले होते.
सावडाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्ट्रीटलाईटसाठी बोगस मूल्यांकन दाखले, पत्र, शिक्के वापरून टेववाडी, कदमवाडी, काटेवाडी, तेलीवाडी, गावठणवाडी, डगरेवाडी, झरवाडी, खांदारवाडी आदी भागात ही कामे करताना अनियमितता करण्यात आल्याची तक्रार सावडाव येथील नयना वैभव सावंत यांनी जुलै २०२३ मध्ये केली होती. त्याबाबतचा उपकार्यकारी अभियंत्यांचा अहवाल प्राप्त झाला होता, त्यावरही तीन सदस्यीय समिती नेमली होती.
दरम्यान, महावितरणच्या समितीने याबाबतची चौकशी पूर्ण करून नुकताच अहवाल सादर केला आहे. सदरचा अहवाल प्राप्त झालेला असून अहवालानुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी कोणावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, तसेच पोलीस तपासात काय पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments