वेंगुर्ले तुळस येथील गावचे रहिवासी प्रसाद बाबली परुळकर यांचे उपचारादरम्यान आज गोव्यात निधन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्हा युवा भंडारी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रसाद बाबली परुळकर यांचे अल्पशा आजाराने गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज दुःखद निधन झाले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील रहिवासी प्रसाद परुळकर यांच्या निधनाने तुळस गावासह वेंगुर्लेसह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
वेंगुर्ले पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अनुश्री कांबळी यांचे भाऊ तर तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन परुळकर यांचे ते चुलत भाऊ होत.
सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले हुशार आणि कर्तृत्ववान युवा व्यक्तिमत्व प्रसाद परुळकर हे वेंगुर्लेतील उद्योजक विलास गावडे यांचे ते विश्वासू सहकारी होते.
प्रसाद परुळकर यांच्या पश्चात आई, पत्नी, तिन विवाहित बहिणी,भावोजी, चुलत भाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, देवगड ,बांदा ,दोडामार्ग, तरळे ,मालवण ,फोंडा ,ओरोस, सातार्डा ,शिरोडा ,आरोंदा, कुडाळ, माणगाव, कणकवली , आंबोली, सावंतवाडी प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments