Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वेंगुर्ले येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

 पामोसा फाऊंडेशन, पुणे व श्री देवी सातेरी देवस्थान वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत सातेरी मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

      या शिबिरात पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.संतोष पाठक हे हृदयविकार, थायरॉईड, मधुमेह, लिव्हर आजार, संधीवात, आमवात, मणक्याचे आजार, बालरोग, त्वचेचे विकार, मुळव्याध, मूतखडा, स्त्रियांचे आजार, केसगळती याबाबत तपासणी करून आहार व आयुर्वेदिक औषध सल्ला तसेच सौंदर्य विषयक सल्ला देणार आहेत. सवलतीच्या दरात औषधेही मिळणार आहेत. इच्छुक रूग्णांनी आपली नावनोंदणी सातेरी मंदिर (९४०४१७९४२९), संजय परब (९४२२४३५७३१) किवा संजय परब (९९२०६५२७०९) यांच्याकडे करावी. जास्तीत जास्त रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments