Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला तुळस फातरवाडा - शेवाळे येथे भरवस्तीत विजय पेडणेकर यांच्या घरा शेजारी सापडली मगर.

वेंगुर्ला तुळस फातरवाडा - शेवाळे येथे भरवस्तीत विजय पेडणेकर यांच्या घरा शेजारी सापडली मगर.

उमेश कुंभार/तुळस
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ला तुळस फातरवाडा शेवाळ येथे श्री विजय पेडणेकर यांच्या घराच्या मागील बाजूस पडवी मधे  भलीमोठी मगर पकडण्यात आली.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ तुळस गावचे उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर उपस्थित होते . यावेळी किशोर नाईक यांनी ही आपला जीव धोक्यात घालून ही मगर पकडली त्यावेळी त्यांच्या सोबत शिवाजी नाईक, गोट्या नाईक, पप्या नाईक, विष्णु पेडणेकर, पप्या पेडणेकर, विनायक नाईक, आपा आरावंदेकर, योगेश माळकर, भाऊ नाईक या सर्व ग्रामस्थांनी किशोर नाईक यांना मगर पडण्यास मदत केली.तर काही वेळात वन विभागाचे अधिकारी श्री संतोष इब्रामपूरकर आले यांनी ती मगर पकडून आपल्या ताब्यात घेतली व ही मगर आपण नैसर्गिक अधिवासात सोडणार असे ते बोलले .या वेळी स्थानिक ग्रामस्थांन सोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की गोवर्धन या पाण्याच्या तळ्यामध्ये अजून 4 मगरी आहेत व त्याठिकाणी माणसांची रहदारी असते त्यामुळे त्या मगरींचा वन विभागाकडून बंदोबस्त करण्यात यावा तुळस गावाचे उसरपंच सचिन नाईक, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर व स्थानिक ग्रामस्थांकडून लवकरात लवकर त्या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन अधिकारी यांच्या जवळ करण्यात आली.



         🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments