नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
विनोदिनी आत्माराम जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मराठीतील एका उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येतो. त्याच अनुषंगाने २०२२-२०२३ व २०२३-२०२४ या दोन वर्षांतील पुरस्कारासाठी कवींनी किंवा प्रकाशकांनी आपले काव्यसंग्रह पाठवावेत, असे आवाहन विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशनतर्फे केले आहे.
काव्यसंग्रह हे सन २०२२- २०२३साठी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ आणि २०२३-२०२४साठी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले असावेत. कवींनी किंवा प्रकाशकांनी आपल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती, कवी परिचय, छायाचित्र, विनंतिपत्र ३१ जुलैपर्यंत सुनील आत्माराम जाधव, एल-९०, 'आईची सावली', म्हाडा वसाहत, वेंगुर्ला, या पत्त्यावर पाठवावेत. या पुरस्कारासाठी आलेल्या कवितासंग्रहांचे परीक्षण साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून केले जाणार आहे. रोख ३ हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments