नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
उभादांडा येथील श्री सागरेश्वर मंदिरच्या मागच्या बाजूला सुरूच्या बागेत ३ मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीत सुरूचे नुकसान झाले आहे, दरम्यान नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे आग वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
सागरेश्वर मंदिरामध्ये रविवारी धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या मागील बाजूने सुरूच्या बागेत धूर येऊ लागला. त्यावेळी पाहिले असता सुरुच्या झाडांना आग लागल्याचे दिसून आले. मंदिरात असलेल्या श्रीकांत रानडे यांनी तात्काळ वेंगुर्ला नगरपरिषद आणि पोलीस ठाणे येथे या आगीची माहिती दिली. त्यानुसार तत्काळ वेंगुर्ला नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आग विझवण्यासाठी मुकादम संतोष जाधव, फायरमन नरेश परब, वाहन चालक गौरव आरेकर, मैनुद्दीन धारवाडकर या कर्मचा-यांनी तसेच मंदिराचे पुजारी विजू सांडये, प्रसाद जोशी व ग्रामस्थांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments