Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले घोडेबाव उद्यान येथील स्‍नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालय (Aspirational Toilet)चा उद्घाटन सोहळा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

 वेंगुर्ले घोडेबाव उद्यान येथील स्‍नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालय (Aspirational Toilet)चा उद्घाटन सोहळा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्‍ट्र तथा सिंधुरत्‍न समृद्धी योजनेचे  अध्‍यक्ष दिपक केसरकर यांच्‍या हस्‍ते घोडेबाव उद्यान येथील स्‍नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालय  (Aspirational Toilet)  चा उद्घाटन सोहळा संपन्‍न
शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्‍ट्र तथा सिंधुरत्‍न समृद्धी योजनेचे  अध्‍यक्ष दिपक केसरकर यांच्‍या हस्‍ते घोडेबाव उदयान येथील स्‍नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालयाचा उद्घाटन सोहळा आज संपन्‍न झाला. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, सुनील डुबळे तसेच वेंगुर्ला शहरातील विविध बचत गटातील महिला, पत्रकार व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या सर्व उदयानांमध्‍ये व पर्यटन ठिकाणी छोटी कॅन्‍टीन उभारण्‍यात येवून जास्‍तीत जास्‍त रोजगार निर्मिती करण्‍यात येणार असल्‍याबाबत मंत्री महोदयांनी यापूर्वी सुचित केले होते त्‍यासअनुसरुन सिंधुरत्‍न समृद्ध योजनेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या घोडेबाव उदयान येथे स्‍नॅक सेंटर उभारण्‍यात आलेले असून वेंगुर्ला शहरातील महिलांनी स्‍वयंपूर्ण होण्‍यासाठी तसेच त्‍यांची आर्थिक उन्‍नती होवून महिला सक्षमीकरणासाठी हे स्‍नॅक सेंटर शहरातील स्‍थानिक बचत गटांना नाममात्र शुल्‍क आकारुन चालविणेस देण्‍यात येणार असल्‍याचे मत मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी व्‍यक्‍त केले.  
 ‘स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला हरित वेंगुर्ला’म्हणून देशभरात वेंगुर्ला शहरास नावलौकिक प्राप्त झालेला आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेसह विविध प्रकारच्या सोई व सुविधा नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येतात. कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्‍या वेंगुर्ला बंदर या ठिकाणी अनेक देशी -  विदेशी पर्यटक मोठया प्रमाणावर भेटी देत असतात. त्‍याचप्रमाणे स्‍थानिक मच्छीमार बांधव व महिला या ठिकाणी मासेमारी व मासे विक्री साठी ये – जा करत असतात.   या महत्‍वाच्या पर्यटन स्‍थळी  पर्यटक व नागरिकांसाठी  वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत स्वच्छ व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा शौचालयाची उभारणी करण्‍यात आलेली असून त्‍याचा उद्घाटन सोहळा महाराष्‍ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्‍न समृद्धी योजनेचे  अध्‍यक्ष मा. श्री. दिपकभाई केसरकर यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला 
याठिकाणी महिला व पुरुष नागरीकांसाठी वेगवेगळे केबीन ठेवण्‍यात आलेले आहेत. प्रत्‍येकी ४ सीट, दिव्‍यांगासाठी रॅम्‍पची सोय, अस्वच्छता तपासण्यासाठी सेन्सर्स अशा प्रकारच्‍या  अत्याधुनिक सुविधांनी हे शौचालय परिपूर्ण आहे तसेच या शौचालयाच्‍या निम्म्या भागामध्‍ये कॉफी शॉप/ स्‍नॅक सेंटर चालविण्‍यात येणार असून यामधून प्राप्‍त होणा-या उत्‍पन्नातून सदर शौचालयाची देखभाल दुरुस्‍ती करण्‍यात येणार आहे.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments