अर्चना फाउंडेशन तर्फे वेंगुर्ला येथे पार पडले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
सावंतवाडी येथील अर्चना फाउंडेशनतर्फे यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आदी स्पर्धा-परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला या ठिकाणी कौन्सिलिंगचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. अर्चना घारे - परब उपस्थित राहिल्या.
या मार्गदर्शन शिबीरामध्ये महेंद्रा अकॅडमीचे महेंद्र पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढावा, यासाठी अर्चना फाउंडेशन तर्फे या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पूर्व व मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीनही टप्प्यांचा अभ्यास कसा करावा, नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षाभिमुख तयारी कशी असावी, संदर्भ साहित्याची अचूक निवड आदी सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले गेले.
तरुणांमधील स्पर्धा परीक्षांबाबतचा न्यूनगंड नष्ट होऊन त्यांच्यात आत्मविश्वास यावा, स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देता यावे, त्यासाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची यंत्रणा उभारून त्या माध्यमातून आर्थिक दुर्बल, गरीब होतकरू विद्यार्थ्यांनाही प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, या उद्देशाने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. अर्चना घारे - परब यांनी या वेळी दिली. तसेच मुलांशी संवाद साधला त्यांचे करिअरच्या संदर्भात काय मत आहे जाणून घेतलं आणि त्यांना पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने अजून काही नवीन करता येईल याचाही आढावा घेतला.
यावेळी वेंगुर्ला तालुक्याच्या माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साठेलकर, स्वप्निल राऊळ, वेंगुर्ला शहर उपाध्यक्ष सुहास कोळसुलकर, समीर पेडणेकर व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शाळेचे प्रिन्सिपल चौगुले सर, देशपांडे मॅडम, पाटोळे सर व इतर शिक्षक उपस्थित होते.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments