Type Here to Get Search Results !

हेल्प ग्रुप आणि एस आर दळवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वांयगणी कोंडुरा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम संपन्न

हेल्प ग्रुप आणि एस आर दळवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वांयगणी कोंडुरा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम संपन्न 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी आणि एस आर दळवी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वांयगणी कोंडुरा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेस महिला, विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या मोहिमेसाठी एस आर दळवी फाउंडेशनचे राज्याध्यक्ष महेश सावंत सर, तसेच जिल्हाध्यक्ष सचिन मदने सर उपस्थित होते. हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सुमन कामत, उपाध्यक्ष हर्षद साळगावकर, सुनील नाईक, प्रवीण राजापूरकर, महेंद्र सातार्डेकर, नारायण पेडणेकर, अरुण आरोलकर, प्रशांत पेडणेकर, सुरेश तांडेल, शेखर तोरस्कर,सिद्धेश कोचरेकर, उल्हास कामत, सत्वशील परब, नागेश तांडेल, उमेश धुरी आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी दळवी फाउंडेशनचे सावंत सर व मदने सर यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच महिला बचत गट प्रतिनिधींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलले. यावेळी मोहिमेस सहभाग घेतलेल्या सर्व महिला, ग्रामस्थ ,विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी एस आर फाउंडेशनचे मदने व सावंत यांनी हेल्थ ग्रुपज फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले स्वागत हेल्प फाउंडेशन चे अध्यक्ष सुमन कामत यांनी केले तर उपाध्यक्ष हर्षद साळगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments