Type Here to Get Search Results !

कळसुली जि.प.शाळा नं.१ छ. शिवाजी महाराज जयंती साजरी

कळसुली जि.प.शाळा नं.१  छ. शिवाजी महाराज जयंती साजरी

कणकवली / प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कळसुली नं.१ या शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उस्ताहात साजरी करण्यात आली.

         यावेळी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस सन्मा. रुजाय फर्नांडिस यांच्या शुभहस्ते शिवप्रतीमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राधिका राजेंद्र कवडे , सहकारी शिक्षक विलीस चोडणेकर  यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषणा द्वारे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी वेशभूषा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीरंग दळवी, द्वितीय मनस्वी दळवी, तृतीय ध्रुवी देसाई, क्रमांक मिळविला व वेशभूषा विद्यार्थ्यांना रुजाय फर्नांडिस पुरस्कृत ट्रॉफी व भेट वस्तू व सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू व खाऊ देण्यात आले. तसेच मुख्याध्यापीका राधिका कवडे व शाळेच्या वतीने सन्मा. रुजाय फर्नांडिस यांचे आभार मानले.          
        यावेळी अंगणवाडी वृषाली बागवे व अंगणवाडी सेवा मदतनीस चित्रा मेस्त्री आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments