Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिंधुदुर्ग विभागाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ१६ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ल्यात

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिंधुदुर्ग विभागाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ१६ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ल्यात

योगेश तांडेल / सिंधुदुर्ग 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिंधुदुर्ग विभागाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ१६ फेब्रुवारी २०२४ रोजी वेंगुर्ले येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह, वेगुर्ला, सिंधुदुर्ग येथे शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ०४.३० वाजता होणाऱ्या ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून मराठी चित्रपट व मालिका अभिनेता, स्वराज्यरक्षक संभाजी (गोरोपंत) मा.श्री. नंदकुमार पाटील, महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, भा.प्र.से, मध्यवर्ती कार्यालयाचे महाव्यवस्थापक श्री. मोहनदास भरसट, मध्यवर्ती कार्यालयाचे मुख्य कामगार अधिकारी श्री. राजेश कोनवडेकर मुंबई पुणे नियंत्रक समितीचे उपमहाव्यवस्थापक श्री. श्रीनिवास जोशी, हे उपस्थित राहणार आहेत.
पारितोषिक वितरण समारंभानंतर या नाट्यस्पर्धेतील
प्रथम क्रमांक विजेते नाटक 'किनारा' चा नाट्यप्रयोग रा.प. रत्नागिरी विभागातर्फे सादर केला जाणार आहे.

या पारितोषिक वितरण समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री.अभिजीत बजरंग पाटीत यांनी केले आहे.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments