Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड नोंदणी कॅम्‍प


वेंगुर्ले शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड नोंदणी कॅम्‍प 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

       वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड  नोंदणी करण्‍याकरीता वेंगुर्ला नगरपरिषद, ज्येष्ठ नागरीक संघटना, वेंगुर्ला तालुका पेशनर्स असोसियशन व आधार फांउडेशन सिंधुदुर्ग यांच्‍या सयुंक्‍त विद्यमानाने आयोजन केले आहे  आयोजनाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

१) दाभोसवाडा, राजवाडा येथील नागरिकांसाठी जि. प. शाळा दाभोसवाडा वेंगुर्ला येथे  १५/०२/२०२४ संध्याकाळी ४ ते ५

२)कुंभवाडा, साकववाडा, गाडी अड्डा, सुंदरभाटले, रामेश्वर मंदीर, माणीक चौक येथील नागरिकांसाठी जि. प. शाळा नं. १ वेंगुर्ला येथे १६/०२/२०२४ संध्याकाळी ४ ते ५

३) महाजनवाडी, हॉस्पीटल नाका, भोसलेवाडी येथील नागरिकांसाठी जि. प. शाळा नं. ३ वेंगुर्ला येथे  १७/०२/२०२४ संध्याकाळी ४ ते ५

४) भटवाडी, कोनी भटवाडी, खांबड भटवाडी येथील नागरिकांसाठी जि. प. शाळा  भटवाडी नं. २ वेंगुर्ला येथे २०/०२/२०२४ संध्याकाळी ४ ते ५

५)कॅम्प भटवाडी, म्हाडा, गवळीवाडा, घाडीवाडा, वडखोल येथील नागरिकांसाठी शिवाजी प्रागतिक शाळा वेंगुर्ला येथे २१/०२/२०२४ संध्याकाळी ४ ते ५

६) देऊळवाडा, पाटीलवाडा, राऊळवाडा, आनंदवाडी येथील नागरिकांसाठी जि. प. शाळा नं. ४ वेंगुर्ला येथे  २२/०२/२०२४ संध्याकाळी ४ ते ५

७)पिराचा दर्गा, भुजनाकवाडी, कलानगर, दाभोली नाका, गिरपवाडा, गावडेवाडी येथील नागरिकांसाठी उपजिल्‍हा ग्रामीण रुग्‍णालय वेंगुर्ला येथे २३/०२/२०२४ संध्याकाळी ४ ते ५

  वेंगुर्ला शहरातील जास्‍तीत  जास्‍त  ज्येष्ठ नागरीकांनी आपल्‍या  जवळच्‍या परिसरातील  कॅम्‍पचा  लाभ घेवुन  आयुष्‍यमान कार्ड व आभाकार्ड काढुन घ्‍यावेत असे  आवाहन श्री. परितोष कंकाळ मा. मुख्‍याधिकारी वेंगुर्ला नगरपरिषद यांनी केले आहे.


        🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी 
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
 प्रतिनिधी नेमणे आहे.
                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments