राष्ट्रीय एकतेचा संदेश आणि सायबर सुरक्षेचा ध्यास; वेंगुर्ला पोलिसठाण्याच्या वतीने 'राष्ट्रीय एकता मॅरेथॉन दौड' उत्साहात संपन्न..
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प परिसरात सकाळी ७.३० वाजता पाच किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन पार पडली. राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर करताना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या दौडमध्ये सुमारे १०० पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीसपाटील आणि नागरिक सहभागी झाले होते.
‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ या दौड स्पर्धेत शंकर परब यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. तेजस देसाई यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक, तर वैभव चौकेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकाविले.
राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेत गौरांग नाईक यांनी प्रथम क्रमांक, पूजा पवार यांनी द्वितीय क्रमांक, तर रेश्मा वरक यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले.
वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता आणि सायबर सुरक्षिततेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
Post a Comment
0 Comments