भक्ती, संगीत आणि कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा सुरेल संगम .... तुळस येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
भक्ती, परंपरा आणि कोकणच्या संस्कृतीशी नाळ जोडलेली भजनकला ही या प्रदेशाची सांस्कृतिक शान आहे. नव्या पिढीने हा समृद्ध वारसा अभिमानाने पुढे न्यावा, असे आवाहन भाजपचे युवानेते विशाल परब यांनी केले.
भारतीय जनता पार्टी तुळस आणि आरसी ग्रुप, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ या राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी तुळस येथे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि युवानेते विशाल परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विशाल परब म्हणाले, “भजन ही केवळ करमणुकीची कला नसून संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेची वाहक आहे. पारंपरिक भजनी मंडळी या कलेच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत आहेत. हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.”
पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सहभाग
तुळस येथील कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह, श्री शिवाजी हायस्कूल येथे २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ही स्पर्धा होत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील निमंत्रित भजन मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
विविध भागांतील भजनशैली, गायनपरंपरा आणि संगीत साधनेचा सुरेल मिलाफ या स्पर्धेत अनुभवायला मिळत आहे. नामांकित कलाकारांची जुगलबंदी, पारंपरिक भजनांचे सादरीकरण आणि स्पर्धक मंडळांच्या मैफलींमुळे तुळस परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
संगीत जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध
स्पर्धेच्या सुरुवातीला झालेल्या विशेष संगीत जुगलबंदी कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. पुरुषोत्तम परब, अमित तांबोळकर आणि विशाल घोगळे यांच्या सुरेल सादरीकरणाला पखवाज वादक भावेश राणे आणि तबला वादक ओंकार मेस्त्री यांनी साथ दिली. या जुगलबंदीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करत उत्स्फूर्त दाद मिळवली.
भजनकलेला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’च्या माध्यमातून भजनकलेला भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच भजनी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ विजेतेपदापुरती मर्यादित न राहता कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरत आहे.
उद्घाटनप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता ताई कोरगावकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उद्योजक सुधीर झांट्ये, वेंगुर्ला भाजप मंडलाध्यक्ष पप्पू परब, सरचिटणीस वसंत तांडेल, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, जैतिराश्रित संस्था अध्यक्ष विष्णू परब, मंगेश राऊळ, देवस्थान मानकरी अनिल परब, पोलीस पाटील सागर सावंत, परीक्षक दीपेश मिस्त्री, मोहन मिस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजनासाठी कार्यकर्त्यांचे योगदान
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर झांट्ये, प्रमोद गोळम, पिंट्या राऊळ, विजय रेडकर, तेजस कुंभार, किशोर सावंत, सुभाष सावंत, राजेश भणगे, रत्नाकर शिरोडकर, बंड्या होडावडेकर, उमेश कुंभार, संतोष सावंत, वैभव होडावडेकर, नंदू बेहेरे, शुभम शेटकर, सिद्धेश शेटकर, नितीन कोचरेकर, पप्पू सावंत, बाबा राऊळ, रोहन सावंत, पुरुषोत्तम परब, नाथा परब, भैय्या घोगळे, आनंद माळकर, दत्ताराम माळकर, राजेश तुळसकर, हर्ष होडावडेकर, हनू गावडे, करण परब, घनश्याम गावडे, आनंद होडावडेकर, भक्ती भणगे, नाथा पांगम, समीर तांबोसकर आणि दाजी चुडजी यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर व सहसूत्रसंचालक अजय नाईक यांनी केले, तर आभार विजय रेडकर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments