बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात जैवविविधता मूल्यमापन या विषयावर कार्यशाळा संपन्न
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील वनस्पती विभागाच्या वतीने तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी 'जैवविविधता मूल्यांकन' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयातील फलोत्पादन विभागाचे प्रमुख प्रा. विरेंद्र देसाई होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील 'रानवा' या संस्थेचे सभासद प्रतीक्षा मिस्त्री प्रकल्प समन्वयक, करिष्मा मोहिते प्रोजेक्ट असोसिएट, युवराज्ञी पाटील ,विष्णू EN हे होते.
या कार्यशाळेचे पहिले सत्र आंबोली येथे घेण्यात आले येथे दुर्मिळ वनस्पतीचे लागवड व संवर्धन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. रानवा संस्थेच्या प्रकल्पांतर्गत दुर्मिळ होत चाललेल्या लंबरशिया आणि मलबारीकम या वनस्पतीचे सुमारे १०० रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कु.नुपूर शिवरकर, कु.जानवी डीचोलकर, ईशान चव्हाण, कु.प्रीती वाडकर आणि अनेक विद्यार्थी सहभागी होते.
दुसऱ्या सत्रात 'रानवा' संस्थेतील सर्व सदस्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरातील वृक्षांची गणना करून त्यांना कार्बन संकलनाचे मोजमाप कसे करावे तसेच सभोवताचे पक्षी, प्राणी, फुलपाखरे यासारख्या जैव घटकांची क्यु.आर कोड तंत्रज्ञांच्या सहाय्याने नोंद कशी करावी फुलपाखरांची नोंदणी, ग्रीन ऑडिट तसेच जी. पीएस उपक्रमाचा प्रभावी वापर कसा करावा याविषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. विरेंद्र देसाई यांनी विद्यार्थ्यांना अशा संशोधनाधिष्ठित उपक्रमांमधून भविष्यात जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि इकोटुरिझम क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. सुदाम माने यांनी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. सदाशिव चुकेवाड, प्रा. सूर्यवंशी, प्रा. नाईक ,ग्रंथपाल प्रा. एस. एस. माने, डॉ. मुजुमदार तसेच इतर प्राध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या विभाग प्रमुख व इकोटुरिझम अभ्यासक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ धनश्री पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या की, या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून महाविद्यालय परिसरातील जैवविविधतेचे विविध ऋतूमध्ये वर्षभर मूल्यमापन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रीती वाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.व्ही.एम.पाटोळे यांनी केले
Post a Comment
0 Comments