महसूल दिनानिमित्त उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा होणार गौरव
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो. सन 2025-26 या वर्षासाठी कोकण महसूल विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावरील महसूल दिन 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड (आलिबाग) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी, मालवणच्या नायब तहसिलदार (संजय गांधी निराधार योजना) प्रिया हरणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी निलेश वेरूळकर, कुडाळचे मंडळ अधिकारी पी. डी. मसूरकर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूल सहायक गोपालसिंग राजपूत व जिल्हाधिकारी कार्यालयाचे वाहन चालक अमित घाडीगावकर यांचा उत्कृष्ट कार्य केल्यासाठी प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments