Type Here to Get Search Results !

हुमरमळा येथील सद्गुरू भाऊ महाराज सेवाश्रमात उद्या गुरु पूर्णिमा उत्सवाचे आयोजन....


हुमरमळा येथील सद्गुरू भाऊ महाराज सेवाश्रमात उद्या गुरु पूर्णिमा उत्सवाचे आयोजन....

नवप्रभात NEWS / कुडाळ 

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील सद्गुरू भाऊ महाराज सेवाश्रम भाक्राड, समर्थनगर येथे, प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही, गुरू पौर्णिमा उत्सव बुधवार, २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी, सकाळी, धार्मिक विधी, १२.३० वा.महाप्रसाद , भजने, नामघोष, इ.कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमांचा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊ महाराज शिष्य परिवार व संयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments