Type Here to Get Search Results !

संगीत परीक्षेत चिंतामणी संगीत विद्यालयाचे उज्वल यश


संगीत परीक्षेत चिंतामणी संगीत विद्यालयाचे उज्वल यश

 नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई अंतर्गत एप्रिल- मे 2026 सत्रात घेण्यात आलेल्या संगीत पखवाज विशारद परीक्षेत श्री चिंतामणी प्रतिष्ठान संचलित श्री चिंतामणी संगीत विद्यालयाच्या खालील विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

कु.सुजल भिकाजी गावडे आणि कु.भाविका लक्ष्मण खानोलकर या दोन्ही विद्यार्थ्यांनी विशारद पूर्ण ही परीक्षेत प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले आहे.

यांना कु. प्रसन्न प्रमोद गावडे आणि कु.वेदांग महेश बोवलेकर यांची उत्तम लेहरा साथ लाभली.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संचालक श्री. निलेश पेडणेकर, श्री.मनिष तांबोस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. 
या यशाबद्दल श्री चिंतामणी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. प्रविण कांदळकर आणि विद्यमान संचालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments