राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धत वेंगुर्ल्याच्या गौरव आजगांवकरची अभिमानास्पद कामगिरी......
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे नवी मुबंई येथे 4 जून ते 6 जून या कालावधीत 29 वी कॅप्टन एस. जे. इझिकल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ला येथील कु. गौरव दत्तप्रसाद आजगांवकर याने उज्वल यश संपादन करत दोन ब्राँझ पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत मुबंई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, धुळे, नाशिक नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील नेमबाज सहभागी झाले होते. कु. गौरव आजगांवकर याने 50 मीटर 22 पीप साईड रायफल प्रोन या प्रकारात दमदार कामगिरी करत राज्यात तिसरी रैंक प्राप्त केली. जुनियर मॅन व युथ मेन मध्ये 600 पैकी 561 गुण मिळवत दोन बाँझ पदकांची कमाई केली. त्याला रत्नागिरी येथील प्रशिक्षक मा. श्री पुष्कराज इंगवले व राजमी इंगवले योचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल आतंरराष्ट्रीय प्रशिक्षक व नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार मा. श्री विक्रम भांगले सर व प्रशिक्षक कांचन उपरकर सर तसेच सिंबुदूर्ग जिल्हा शुरींग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. त्याच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments