Type Here to Get Search Results !

मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तुळस ग्रामपंचायतीला दिली शैक्षणिक भेट....

मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तुळस ग्रामपंचायतीला दिली शैक्षणिक भेट....

नवप्रभात NEWS  / वेंगुर्ले 

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी RHWE (Rural Horticulture Work Experience) कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत तुळस येथे शैक्षणिक भेट दिली.
 यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच माननीय रश्मी परब यांची भेट घेऊन ग्रामीण विकास, शेती व फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.  
ग्रामपंचायत कार्यालयात विद्यार्थ्यांनी गावातील विकासकामे, स्वच्छता मोहीम, पाणी व्यवस्थापन, कृषी योजना तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांची माहिती घेतली. सरपंच माननीय रश्मी परब यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत ग्रामीण भागातील शेती व फलोत्पादनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात कार्य करताना शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मार्गदर्शन केले.  
RHWE कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामपंचायत प्रशासन, कृषी विस्तार कार्य तसेच शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा मौल्यवान अनुभव मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, अशा शैक्षणिक भेटींमुळे त्यांना व्यवहारिक ज्ञान प्राप्त होत असून भविष्यात कृषी व फलोत्पादन क्षेत्रात काम करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.  
या शैक्षणिक भेटीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अरिन मोंडे, धनंजय साळवी, यशराज पाटील, ओम कुंभार, सिद्धार्थ चौधरी, अमित टोकसिया आणि दिनेश बिश्नोई यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती घेत ग्रामीण विकासामध्ये युवकांची भूमिका या विषयावरही चर्चा केली.  
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्याबद्दल आभार मानले. या शैक्षणिक भेटीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बाबींची माहिती मिळवली.

Post a Comment

0 Comments