Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला महिला काथ्या कारखान्याच्या जागेत राजकीय पक्षांच्या बैठकींचा सुळसुळाट...जागेचा वापर चुकीच्या कारणासाठी ... संदीप पेडणेकर

वेंगुर्ला महिला काथ्या कारखान्याच्या जागेत राजकीय पक्षांच्या बैठकींचा सुळसुळाट...जागेचा वापर चुकीच्या कारणासाठी ... संदीप पेडणेकर 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

महिला काथ्या कारखाना कॅम्प वेंगुर्ला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक घेण्यात आली. ती बैठक तालुकाध्यक्षना विश्वासात न घेता अनाधिकृत घेण्यात आली, असा आरोप वेंगुर्ले तालुका अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संदीप पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्री.पेडणेकर म्हणाले, अश्या प्रकारे राजकीय फायद्यासाठी संस्थेचा वापर करणे हा सत्तेचा गैरवापर असून यामुळे संस्थेच्या स्वय्यत्ततेला बाधा येत आहे. स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महिला काथ्या संस्थेच्या जागेचा वापर सध्या चुकीच्या कारणासाठी होत आहे. संस्थेच्या अधिकृत जागेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनर लावून बैठका आणि मेळावे आयोजित केले जात असून हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप संदीप पेडणेकर यांनी केला आहे. तसेच यापुढे या संस्थेच्या जागेत अश्या बेकायदेशीर बैठका घेण्याा आल्या तर आपण या. विरोधात सहकार निबंधक आणि संबंधित विभागाकडे सहकार कायदा कलम ७९ किंवा ८३ नुसार चौकशीची मागणी करणार आहे.
तसेच ही बैठक आयोजित केलेल्या आयोजकांवर आणि बैठकीत उपस्थितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे, असे संदीप पेडणेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments