Type Here to Get Search Results !

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज..... विजय चौकेकर

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज..... विजय चौकेकर

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असून भीती, अज्ञान आणि चुकीच्या मान्यतेतून जन्मलेली अंधश्रद्धा हि समाजाला लागलेली किड आहे ती समाजाच्या वैज्ञानिक व मानसिक विकासात अडथळा निर्माण करते त्यामुळे होणारे लैंगिक अत्याचार, नरबळी किंवा जादूटोणा, मानवी हक्कांचे उल्लंघन करते आणि शोषण वाढवते. या अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, तर्कशुद्ध विचार करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत यांनी डॉ. रा. धो. खानोलकर केंद्र शाळा मठ क्रमांक एक येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात केले. यावेळी अभा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विजय चौकेकर यांनी शिक्षक व मुलांना भोंदू बाबा कसे फसवणूक करतात त्या बाबतीत प्रात्यक्षिके दाखवली.  
 यावेळी महिला संघटक 
रूपाली पाटील यांनी सध्या 
अंधश्रद्धेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असं सांगुन अनेकदा लोक भोंदू बाबांच्या नादी लागून आपल चारित्र्य , पैसा आणि आरोग्य गमावतात. जनावरांचा किंवा नरबळी देण्यासारख्या अमानवी घटना आजही घडतात, ज्या मानवी हक्कांचे आणि कायद्याचे थेट उल्लंघन आहे असे सांगितले स्त्रियांना अनेकदा 'डायन' किंवा 'अशुभ' मानून छळले जाते, ही पण सर्वात मोठी सामाजिक कीड आहे असंहि सांगितले. कार्यक्रमात कवी गोसावी यांनी ' बया बाईच्या आलं अंगात ' हे भारुड सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा तेजस्विनी गुरव, अभा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत, कार्याध्यक्ष विजय चौकेकर, जिल्हा महिला संघटक रूपाली पाटील, वेंगुर्ले तालुका महिला संघटक सिमंतीनी मयेकर, प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, उपशिक्षक पंढरीनाथ भोई, ज्योती सावंत, पदवीधर शिक्षक गणेश नाईक उपस्थित होते.यावेळी पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांनी मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले संवर्धन साठी केलेल्या भरीव कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभाग महावारसा समितीचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments