Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले कोट उर्फ डच वखारचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार.. नितेश राणे

वेंगुर्ले कोट उर्फ डच वखारचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार.. नितेश राणे 

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली असलेला व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार हा भुईकोट किल्ला डच यांनी व्यापारीकरणाच्या उद्देशाने सुमारे १६३७ ते २६४१ बांधलेला होता. सदर डच यांचे प्रतिनिधी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात उपस्थित होते व डच हे वेळोवेळी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य कार्य बांधणी साठी नजराणा पाठवायचे. त्या काळात शिवमोहरा तयार करण्यासाठी लागणारे तांबे डच यांनी शिवाजीराजांना पुरवल्याचा उल्लेख ऐतिहासीक कागदपत्रांमध्ये सापडतो, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार एक महत्त्वाचा ठेवा तो वाचवण्यासाठी परत एकदा कमी पडत असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे निवेदन जनसेवा प्रतीष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभाग मंत्रालय महावारसा समिती, सिंधुदुर्गचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. निलेश राणे यांना दिले. मा. निलेश राणे यांनी याबाबत डॉ.संजीव लिंगवत यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली व ऐतिहासिक वास्तू संवर्धन व संरक्षणासाठी आपण सतत आग्रही असल्याचे सांगितले व लवकरात लवकर निधी उपलब्ध करून राहिलेलं काम मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले . यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments