आरवली-बागकरवाडी ब्राह्मण मंदिराचा २६ रोजी वर्धापनदिन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली बागकरवाडी येथील श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन आणि श्री सत्यनारायण महापूजा २६ एप्रिल रोजी होणार आहे. त्या निमित्त स. १० वा. लघुरूद्र, अभिषेक आणि महापूजा, दु. १२ वा. आरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, ७ वा. बागकरवाडी ग्रामस्थ मंडळाचे भजन, ७.३० वा. लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि रात्री १० वा. दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिर ट्रस्ट व समस्त बागकरवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments