निरामय विकास संस्था सावंतवाडी यांच्या वतीने दाभोली इंग्लिश स्कुल शाळेस शैक्षणिक टॅब भेट
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
निरामय विकास संस्था सावंतवाडी यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली शाळेस शैक्षणिक टॅब भेट देण्यात आले संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनघा सबनीस, उपध्यक्षा सुधाताई सबनीस सचिव वंदना करंबळे कर आसावरी बर्वे अस्मिता सबनीस यांच्या शुभ हस्ते शाळेस चार टॅब प्रदान करण्यात आले या वेळी पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री आत्माराम उर्फ बाळू खानोलकर शाळेचे मुख्यद्यापक श्री किशोर सोन सूर कर, रेश्मा चोडणकर श्री वसंत पवार आदी मान्यवर उपस्तित होते
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या विविध शैक्षणिक सहशालेय उपक्रमात सहभागी असणारी एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळख निर्माण करणारी जीवन शिक्षण अर्थात जीवन कौशल्य विविध शालेय उपक्रमातून विद्यार्थी मध्ये रुजवणारी दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली या शाळेस निरामय संस्था सावंतवाडी या संस्थेच्या पदाधिकारी नि शाळेस प्रत्यक्ष भेट दिली व शाळेची माहिती घेतली
या वेळी विशेष म्हणजे शाळेमध्ये सुरु असलेल्या विविध उपक्रम ची माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उस्पुरत पणे दिली शाळेत सुरु असलेल्या तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत शेती व बागकाम तंत्रज्ञान, अभियांत्रिकी तंत्रज्ञान, ऊर्जा व पर्यावरण, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान या विभागाची माहिती शालेय विद्यार्थी नि दिली या विभागतून विविध प्रात्यक्षिक कार्य मधून तयार केलेल्या वस्तू इत्यादी ची माहिती दिली, शाळेचा आद्ययवत प्रयोगशाळा व स्मार्ट बोर्ड चा वापर दैनंदिन अभ्यास मध्ये कसा केला जातो स्मार्ट बोर्ड ची हाताळणी वापर कसा केला जातो याची माहिती विद्यार्थी नि दिली शाळेतील ओपन agriculture क्लास रूम आमची देवराई औषधी वनस्पती उदयान, मिनी आई टी आई उदयान, ग्रंथालय, तसेच शाळेने राबविलेले विविध उपक्रम देस न्यूज चॅनेल, चटणी भाकरी महोत्सव, विज्ञान जत्रा, बाल साहित्य संमेलन आदी उपक्रम पाहून मान्यवर भारावून गेले
भविष्यात शाळेच्या विविध उपक्रमास शुभेच्छा देऊन आणखी तीन टॅब शाळेस जून महिन्या मध्ये देणेच जाहिर केले मुख्यद्यापक श्री किशोर सोन सूर कर सर यांनी शाळेत लवकरच AI बाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन विशेष वर्ग शाळेत सुरु करण्या बाबत सांगितले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील AI तंत्रज्ञान बाबत मार्गदर्शन करणारी एक शाळा म्हणूनलवकरच या शाळेची ओळख निर्माण केली जाईल असे सांगितले
शाळेतील विद्यार्थी नि या टॅब चा वापर करताना स्वतः च्या कौशल्य व बुद्धीच वापर अधिक करून फक्त तांत्रिक बाबतीत गरज वाटल्यास च कृत्रिम बुद्धिमातेचा उपयोग विचार पूर्वक वापर करावा असे सांगितले याावेळी उपस्थितांचे आभार श्री वसंत पवार सर यांनी मानले
Post a Comment
0 Comments