दाभोली इंग्लिश स्कुल मध्ये AI प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ...
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
निरामय फॉउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने शाळेस नुकत्याच मिळालेल्या चार टॅब तसेच भागीरथ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या सहकार्य ने प्राप्त स्मार्ट इन्टेरेक्टिव्ह बोर्ड च्या सहाय्याने या प्रशिक्षण वर्गात माहिती दिली जाणार आहे.
सिंधुदुर्ग मधील एक उपक्रम शील शाळा म्हणून या शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेने हा उपक्रम राबवित असले बाबत समाधान व्यक्त केले या वेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश खानोलकर, श्री किशोर शांताराम सोन्सूरकर श्री वसंत पवार सौ रेश्मा भालचंद्र चोडणकर, श्री नितीन घोगले आदी मान्यवार उपस्तित होते
शाळेत सुरु असलेल्या तंत्र शिक्षण विभाग सोबत आता संगणक अर्थात AI प्रशिक्षण वर्ग विद्यार्थी ना उपयुक्त ठरेल असे मुख्यद्यापक श्री किशोर शांताराम सोन्सूरकर यांनी सांगितलं भविष्यात दाभोली हाईस्कुल मध्ये माजी विद्यार्थी हितचिंतक यांच्या सहकार्य ने अध्ययवत संगणक प्रयोगशाला उभारण्याचा मानस व्यक्त केला
दिनांक 23 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत सदर प्रशिक्षण वर्ग सुरु होतील विद्यार्थी पालक तसेच प्राथमिक शाळे तील विद्यार्थी यांना सदर प्रशिक्षण वर्ग खुला राहील असे आवाहन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री संजय आरोलकर पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री बाळू खानोलकर तसेच मनाली हळदणकर अध्यक्ष दाभोली इंग्लिश स्कुल शाळा बचाव संघर्ष समिती यांनी केले
Post a Comment
0 Comments