Type Here to Get Search Results !

डॉक्टर्स फ्रटर्नीटी क्लब, सिंधुदुर्गच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या डॉ. सुरेखा काळे यांचा वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन तर्फे सन्मान......

डॉक्टर्स फ्रटर्नीटी क्लब, सिंधुदुर्गच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या डॉ. सुरेखा काळे यांचा वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन तर्फे सन्मान......

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 


जगातील सर्वात जास्त प्रगतीशील असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस क्रांतीकारक बदल होत असुन जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील डॉक्टर्स यांना पण हे ज्ञान अवगत करून देण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर्स फ्रटर्नीटी क्लब, सिंधुदुर्ग हि संस्था करत आहे. महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या शाखांमधील तज्ञ मंडळी यांनी आमंत्रित करून नवनवीन रोग, औषधे, लसीकरण, शस्त्रक्रिया आणि तांत्रिक ज्ञानाची माहिती प्रशिक्षण शिबिरांच्या व कार्यशाळांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना देण्यात येते. असे प्रतिपादन वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे सचिव व जनसेवा प्रतीष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी अलीकडेच डॉक्टर्स फ्रटर्नीटी क्लब, सिंधुदुर्गच्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आलेल्या वेंगुर्ले येथील डॉ. सुरेखा काळे यांचे वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन तर्फे सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनंदन करुन शुभेच्छा देताना केले. यावेळी डॉक्टर्स फ्रटर्नीटी क्लबच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या डॉ. सई लिंगवत यांचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ . दिपाली पालयेकर, सह सचिव डॉ. क्लारा होडावडेकर व डॉ. श्रीया सावंत यांचे वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे यांनी तर खजिनदार डॉ. अफशान कौरी, सह खजिनदार डॉ. हर्षाली परब व डॉ. स्नेहा नवाल यांचे वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे मार्गदर्शक डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी अभिनंदन केले . यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे डॉ. वामन कशाळीकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ. ज्ञानेश्वर शिवचरण, डॉ. प्रसाद प्रभू साळगांवकर, डॉ. राजेंद्र गावसकर , डॉ. के. जी. केळकर उपस्थित होते. इ. स. २०२६ -२७ साठी नियुक्त करण्यात आलेल्या या पदाधिकाऱी यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात डॉक्टरांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे पण आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. राजेश्वर उबाळे यांनी सांगितले. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील डॉ. सुदीश सावंत, डॉ. सोनाली सावंत, डॉ. दिपाली देसाई, डॉ. राखी माधव, डॉ. अमेय प्रभुखानोलकर, डॉ. अमरेश होडावडेकर, डॉ. आर. एम. परब, डॉ. महेंद्र सावंत, डॉ. रायाजी सातोसकर, डॉ. अभिजीत वणकुद्रे, डॉ. मनोज आरोसकर, डॉ. डि.टि. गोसावी, डॉ. तनिषा घुरी, डॉ.अबिदा परब, डॉ. शामल मांजरेकर, डॉ. मेघना मुसळे, डॉ. सतिश पाटील, डॉ. सोनाली खानोलकर, डॉ. भिवा नाईक, डॉ. दत्ता पवार, डॉ. स्वप्नाली पवार, डॉ. लक्ष्मण प्रभू, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, डॉ. संजय रावळ, डॉ. सुप्रिया रावळ, डॉ. जाई पेडणेकर, डॉ. मानसी सातार्डेकर, डॉ. श्रीराम हिर्लेकर उपस्थित होते. जिल्हा स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी यावेळी वेगवेगळ्या समित्या आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत डॉ. संजीव लिंगवत यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. राजेश्वर उबाळे यांनी केले. कार्यकर्त्यांना वेंगुर्ले तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टर्स उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments