महिला दिना निमित्त वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने ९ व १० मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने जागर स्त्रीशक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक ९ मार्च आणि मंगळवार दिनांक १० मार्च रोजी करण्यात आले आहे.
वायंगणी ग्रामपंचायत येथे होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात सोमवार दिनांक ९ मार्चला सायंकाळी ५ वाजता पाककला स्पर्धा, सहा वाजता स्वागत गीत, सायंकाळी ६:३० वाजता उद्घाटन आणि महिलांसाठी सत्कार समारंभ. तर ७ वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवार १० मार्चला सायंकाळी सात वाजता वेशभूषा स्पर्धा पारंपरिक वेशभूषा मुलांसाठी डान्स स्पर्धा, सायंकाळी आठ वाजता महिलांसाठी ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम वायंगणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रासाठी मर्यादित असून या सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविण्याचे आवाहन वायंगणी ग्रामपंचायत सरपंच दत्ताराम दुतोंडकर आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments