Type Here to Get Search Results !

वेतोरे येथील जेष्ठ मुत्रपींड दाते दिलीप धुरी यांचा देहदान संघातर्फे सन्मान......

वेतोरे येथील जेष्ठ मुत्रपींड दाते दिलीप धुरी व मुत्रपीड प्राप्ते रंजन धुरी  यांचा देहदान संघातर्फे सन्मान......

नवप्रभात NEWS  / सिंधुदुर्ग 

भारतात दोन लाखांहून अधिक रुग्ण डायलिसिस उपचार खाली असुन दरवर्षी साधारण ३१ टक्केंनी डायलिसिस गरज वाढत आहे. दोन लाख लोक डायलिसिस उपचार उपलब्ध नसल्याने किंवा परवडत नसल्याने मृत्यूमुखी पडत असुन असुन जगभरात साधारण पंचवीस लाखांहून जास्त लोक डायलिसिस उपचार खाली आहेत. भारतात अवयव निकामी होण्याचा दर प्रचंड प्रमाणात वाढत असून अवयव दानाच्या प्रतिक्षा यादीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अवयवदान व देहदान महासंघाचे सदस्य व सक्रिय कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी जागतिक मुत्रपींड दिना निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील जेष्ठ नागरिक मुत्रपींड दाते दिलीप धुरी व मुत्रपीड प्राप्ते रंजन धुरी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देताना केले. यावेळी डॉ. सई लिंगवत, दिपीका धुरी, कार्तिक दरेकर उपस्थित होते . सर्वसामान्य गरीब परिस्थिती असलेले ६५ वर्षे वयाचे जेष्ठ नागरिक दिलिप धुरी यांनी अलीकडेच आपला पंचवीस वर्षे वयाचा मुलगा रंजन धुरी यांना किडनी दान केली असुन मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये हि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. जागतिक मूत्रपिंड दिनाचे महत्त्व मूत्रपिंडाच्या आजाराचे लवकर निदान आणि प्रतिबंध करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आहे. जोखीम घटक, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता वाढवून, जागतिक मूत्रपिंड दिन व्यक्तींना त्यांच्या मूत्रपिंडाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यास प्रोत्साहित करतो. दिवसेंदिवस भारतात मूत्रपिंडाचे आजार वाढत असुन सुरुवातीला मळमळ आणि उलट्या, स्नायू पेटके, भूक न लागणे, पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणे, कोरडी, खाज सुटणारी त्वचा, श्वास लागणे, झोपेचा त्रास होणे, खूप जास्त किंवा खूप कमी लघवी होणे, हि लक्षणे दिसतात. शरिरातील किडनी संपूर्ण रक्त फिल्टर करणे, द्रव संतुलित करणे आणि चयापचय कचरा काढून टाकणे हे काम करतं असुन या वर्षी जागतिक मूत्रपिंड दिनाची थीम "सर्वांसाठी मूत्रपिंड आरोग्य - लोकांची काळजी घेणे, ग्रहाचे रक्षण करणे" आहे, यात ग्रह म्हणजे पर्यावरण संवर्धन व संतुलन असा अर्थ आहे .अति उष्णतेमध्ये वारंवार होणारा निर्जलीकरण मूत्रपिंडांवर ताण आणतो. कालांतराने, तो ताण मूत्रपिंडाच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. त्याचप्रमाणे पाण्याची गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे. असे डॉ. संजीव लिंगवत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments