मराठी कवितागायन स्पर्धेत आदित्य नवार प्रथम
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे 27 फेब्राुवारी रोजी इयत्ता चौथी ते सातवीच्या मुलांसाठी त्यांच्या पाठ¬पुस्तकातील मराठी कवितागायन स्पर्धा घेण्यात आली. यात उभादांडा नं.1च्या आदित्य नवार याने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत 33 मुलांनी सहभाग घेतला. विजेत्यांमध्ये द्वितीय-तनिष्का केळुसकर (वेंगुर्ला नं.1), तृतीय-सान्वी परब (परबवाडा नं.1), भार्गवी यादव (वेंगुर्ला हायस्कूल) आणि माधव ओगले (वेंगुर्ला नं.2), उत्तेजनार्थ - सविना आल्मेडा (मदर तेरेसा स्कूल), सान्वी रजपूत (वेंगुर्ला नं.1), आर्या चेंदवणकर (एम.आर.देसाई), वेदांगी राऊळ (शिवाजी प्रागतिक), लावण्या गोकरणकर (नवाबाग शाळा) यांचा समावेश आहे.
प्रथम तिन विजेत्यांना अनुक्रमे 500, 300 आणि 200 ची तीन तसेच उत्तेजनार्थ पाचही विजेत्यांना प्रत्येकी 100 रूपयांचे रोख पारितोषिक देऊन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्मिता वागळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कैवल्य पवार व विठ्ठल करंगुटकर यांनी केले.
कवितेतील प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. कविता म्हणताना ती ऐकणा-याच्या मनाला भिडली पाहिजे. विद्याथ्र्यांनी कवितागायन म्हणजे काय? व ते कसे करावे हे समजून घेण्यासाठी टी.व्ही.वर होणारे काव्यगायनाचे कार्यक्रम अवश्य पहावेत असे प्रतिपादन कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी केले.
या कार्यक्रमाला सदानंद बांदेकर, श्रीनिवास सौदागर, मयुरेश सौदागर, चेतन प्रभू, अदिती प्रभू, हिमानी प्रभू यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक, सभासद उपस्थित होते. कैवल्य पवार यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments