Type Here to Get Search Results !

आंदुर्ले ग्रामपंचायत व ग्राम महसुल अधिकारी कार्यालय आंदुर्ले यांच्या वतीने आंदुर्ले गावात हयात दाखले वाटप शिबीर संपन्न


आंदुर्ले ग्रामपंचायत व ग्राम महसुल अधिकारी कार्यालय आंदुर्ले यांच्या वतीने आंदुर्ले गावात हयात दाखले वाटप शिबीर संपन्न

नवप्रभात NEWS / कुडाळ 

      मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायत व ग्राम महसुल अधिकारी कार्यालय आंदुर्ले यांच्या वतीने आंदुर्ले येथे हयात दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.कुडाळ तालुक्यातील हयात दाखले वाटप शिबीर घेणारी आंदुर्ले ही पहीली ग्रामपंचायत ठरली.विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची वेळ वाचला व त्यांच्या शारीरिक श्रमातसुद्धा थोडी कपात झाली.या शिबीराला आंदुर्ले सरपंच श्री.अक्षय तेंडोलकर, उपसरपंच श्री.अनिल भगत,माजी उपसरपंच श्री.चंद्रकीसन मोर्ये,ग्राम महसुल अधिकारी व्हि.डी.देसाई मॅडम,आरोग्य कर्मचारी,सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक श्री.अशोक मेतर हे उपस्थित होते.या शिबीराचा आंदुर्ले गावातील ५३ लाभार्थी यांनी लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments