आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तर्फे आंबोली येथे मान्यवरांचा नागरि सत्कार सोहळा संपन्न
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आंबोली हायस्कूलच्या सभागृहात 20 मान्यवर व्यक्तींचा नागरि सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री. विष्णू चव्हाण यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष श्री. मोहन पाटणेकर, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. दर्शना केसरकर, सचिव श्री. राकेश केसरकर, श्री. असलम शेख, श्री. बाळा कोरगांवकर, श्री. बाळकृष्ण गावडे, श्री. सुशील तावडे, सरपंच सौ. सावित्रीबाई पालेकर, पोलीस पाटील सौ. विद्या चव्हाण, श्री. शशिकांत गावडे, श्री. हेमंत ओगले आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन आंबोली हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये – सरपंच सौ. सावित्रीबाई पालेकर (पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल) पोलीस पाटील सौ. विद्या चव्हाण (आंबोली येथे 15 वर्षे निर्भीड सेवा) विठू माऊली दशावतार मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवराम गावडे,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. आत्माराम गावडे जैवविविधता संघटक व संशोधक श्री.हेमंत ओगले तसेच वनविभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत, आपत्कालीन व्यवस्था संघटना, रेस्क्यू टीमचे श्री. संतोष पालेकर व श्री. उत्तम नांवेंकर, पंचायत समिती सदस्या श्री. मायकल डी यांचा सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत माजी सदस्य शंकर चव्हाण, काशिराम राऊत यांचा तसेच
सदर कार्यक्रमाला सभासद आणि पदाधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
Post a Comment
0 Comments