जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, यांच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ च्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २१ ते २५ मार्च २०२६ च्या कालावधीत कुडाळ हायस्कूल पटांगण कुडाळ येथे होणार आहे.
या प्रदर्शनाचे मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे.
या प्रदर्शनासाठी आमदार सवश्री, डॉ. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे , दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ नगरपंचायतचे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनासाठी निमंत्रित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जयप्रकाश परब, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार यांनी या प्रदर्शनासाठी सर्वांना निमंत्रित केले आहे.
Post a Comment
0 Comments