Type Here to Get Search Results !

मळगाव वाचनालयात महिला सन्मान सोहळा संपन्न


मळगाव वाचनालयात महिला सन्मान सोहळा संपन्न 

नवप्रभात NEWS / सावंतवाडी 

जागतिक महिला दिना निमित्त सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव येथे श्रीमती. श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर/पटेकर पुरस्कृत कै. यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष श्री. महेश खानोलकर, प्रमुख अतिथि सौ. कावेरी कासरलकर/मयेकर, (लेखिका व मानसशास्त्रीय समुपदेशक) सत्कारमुर्ती डॉ. सौ. अश्विनी मिलिंद खानोलकर (बालरोगतज्ञ) वाचन मंदिरच्या पहिल्या कर्तृत्वान सन्मानित महिला सौ. ललिन प्रभाकर तेली उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

ग्रंथालयातर्फे सन्मानमूर्ती डॉ. सौ. अश्विनी मिलिंद खानोलकर यांचा सन्मान शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन प्रमुख अतिथि सौ. कावेरी कासरलकर/मयेकर, यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सन्मान पत्राचे वाचन सुप्रसिध्द लेखिका सौ. स्मिता रविंद्र नाईक यांनी केले.

प्रमुख अतिथि सौ. कावेरी कासरलकर/मयेकर यांनी महिला दिना बरोबर पुरुष दिन साजरा झाला पाहिजे! महिलांना शिकण्या सारख्या खुप गोष्टी आहेत. इतराचे ऐकणे है एक मोठी कला आहे. महिलांनी अत्याचार होण्यापूर्वी स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यावी, एकटे पणात वेळ कसा घालवावा. घरच्यांशी संवाद कसा साधावा यांसाठी आपण 'कात्यायनी' पुस्तक लिहिले ते सर्वांनी वाचावे. आपण स्वताःसाठी वेळ द्यावा. मोबाईलच्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात. वाचना मुळे आपण अन्याय व अत्याचार यापासून स्वतः वाचू शकणार आहात. अशा प्रकारे मार्गदर्शन केले.

सत्कारमुर्ती डॉ. अश्विनी मिलिंद खानोलकर यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालयाने दिलेल्या सन्माना प्रती आदर व्यक्त करून. मला माझ्या व्यवसाय सेवेत व समाज सेवेत सासु, सासरे, पती, यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी मला भरपूर प्रेम व सहकार्य केले. यावेळी तिने आपल्या सेवेत चिमुकल्या पेंशटने भरपुर प्रेम दिले हि मुले या पुरस्काचा भाग आहे असे आवर्जून सांगितले. तसेच मुलांना जंफुड चे सेवन करून देऊ नका असे सांगून त्यांना मोड आलेली कडधान्ने, फळे, पालेभाज्या, ड्रायफुट्स द्यावी. पालकांनी मुलांचे पालक होण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून त्यांना मनसोक्त खेळायला द्यावे. मोबाईलच्या वापरापासून शक्यतो दुर ठेवावे. त्यांच्या आहार विहारा कडे विशेष लक्ष द्यावे. अशा प्रकारे मौलिक मार्गदर्शन केले.

यानंतर वाचन मंदिरच्या प्रथम सन्मानीत महिला सौ. ललिन प्रभाकर तेली यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. स्त्री श्रेष्ठ आहे ! नारीशक्ती जगात भारी आहे. जन्माला आलेला पुत्र कुलदिपक असेल तर मुलगी ही दिपीका आहे. स्त्री ही सक्षम असून, कोणत्याही क्षेत्रात कर्तबगारी दाखवू शकते. ती संधीच्या शोधात आहे. संधी दिल्या शिवाय ती पुढे जाऊ शकत नाही.

कार्यक्रमाला ग्रंथालयाचे उपध्याक्ष बाबली नार्वेकर, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गवंडे, चंद्रकांत जाधव, डॉ. मिंलीद खानोलकर, निखिल कासरलकर, कर्मचारी वर्ग तसेच महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सुत्रसंचालन व आभार कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी केले

Post a Comment

0 Comments