Type Here to Get Search Results !

वायंगणी येथे उद्या 'मयुरध्वज - ताम्रध्वज' संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

वायंगणी येथे उद्या 'मयुरध्वज - ताम्रध्वज' संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

आपल्या कौशल्यावर व बुद्धिमत्तेच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्हयात नावलौकिक प्राप्त दशावतारी कलाकारांच्या संच्यात मंगळवार दि.०३ मार्च रोजी सायं. ७ वा. संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग वायगंणी कामतवाडी येथील श्री देव काजरेश्वर मंदिर येथे सादर होणार आहे

वेंगुर्ले तालुक्यातील वायगंणी कामतवाडी येथील श्री देव काजरेश्वर मंदिर येथे सादर होणाऱ्या 'मयुरध्वज - ताम्रध्वज' या संयुक्त दशावतार नाट्य प्रयोगामध्ये पुढील प्रमाणे कलाकारांचा समावेश असणार आहे.
गणपती : बाबा कामत
रिद्धी सिद्धी: रामचंद्र बांदवलकर
ब्राम्हणः संजय वालावलकर
ताम्रध्वज: अशिष पालकर
वृषकेतू : साहिल तळकटकर
अर्जुन : पुरुषोत्तम खेडेकर
मेघवर्ण: सतिश बागवे
कृष्ण :पुरुषोत्तम कोचरेकर
शुध्दमती : ओमप्रकाश चव्हाण
मयुरध्वज च्या तुफान भुमिकेत मंगेश (दादा) राणे

संगीत साथ
हार्मोनिअम : संकेत कुडव पखवाज निखिल निकम
झांज : प्रविण मातोंडकर
विशेष सहाय्यक :अनिल कामत
 श्री देव काजरेश्वर मंदिर, वायगंणी कामतवाडी येथे सादर होणार आहे या नाट्यप्रयोगाचा नाट्यरचपणे लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments