शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद....ओजस्वी भाषणांनी परीक्षक प्रभावित; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासपूर्ण सहभाग
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
शिवजयंतीनिमित्त बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे गुणवत्ता हमी कक्ष व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, राष्ट्रधर्म आणि राष्ट्रउभारणीचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत जिल्हाभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण मांडणी, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि ओजस्वी वक्तृत्वाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या उपक्रमाच्या समन्वयक, ग्रंथपाल शुभदा माने यांनी सदर कार्यक्रमाचा उद्देश व थोडक्यात रूपरेषा मांडली. यावेळी व्यासपीठावर नॅक समन्वयक प्रा. एस. एच. माने, संस्था प्रतिनिधी प्रा. वीरेंद्र चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी विवेक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. शितोळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असून अशा वक्तृत्व स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि विचारांची सुसूत्र मांडणी करण्याची क्षमता विकसित होते.
शालेय गट (इ. ७ वी पर्यंत) विजेते :
प्रथम – पार्थ उमेश सावंत (आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी)
द्वितीय – हर्षांक रमेश टेमकर ( सिंधुदुर्ग विद्यानिकेत, वेंगुर्ला)
तृतीय – भूमी सचिन परुळकर ( श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस)
उत्तेजनार्थ प्रथम – तनिष्का गुंजन केळुसकर (जि.प.वेंगुर्ला नं. १)
उत्तेजनार्थ द्वितीय – वृषाली संदीप वर्पे ( जि.प.वेंगुर्ला नं. १)
शालेय गट (इ. ८ वी ते १० वी) विजेते :
प्रथम – पार्थ प्रदीप सामंत ( टोपीवाला हायस्कूल, मालवण)
द्वितीय – अस्मि प्रवीण मांजरेकर (आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी)
तृतीय – यज्ञेश युवराज शिंदे ( नेमळे हायस्कूल, नेमळे)
उत्तेजनार्थ प्रथम – अदिती विवेक चव्हाण ( सिंधुदुर्ग विद्यानिकेत, इंग्लिश मिडीयम स्कूल)
उत्तेजनार्थ द्वितीय – गाथा दत्ताराम कोळंबकर ( न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा)
खुला गट विजेते :
प्रथम – वीणा वामन गावडे (पेंडूर)
द्वितीय – संग्राम सतिश कासले (मालवण)
तृतीय – सविता रामकृष्ण वाळके (कुडाळ)
उत्तेजनार्थ प्रथम – साक्षी सचिन राणे (देवगड)
उत्तेजनार्थ द्वितीय – अंकिता संतोष पाटील-नाईक (सावंतवाडी)
सर्व गटांतील पहिल्या पाच क्रमांकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र तसेच बॅ. बी.के. कॉलेज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना रंगोली स्क्रीन प्रिंटर्स यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रगती विवेक चव्हाण, प्रा. बाबुराव खवणेकर, ग्रंथपाल प्रा. शुभदा माने, प्रा. प्रियंका प्रभू, प्रा. सीमा सावंत व प्रा. हराळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी. एम. देसाई व प्रा. पी. जी. देसाई यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
Post a Comment
0 Comments