कुडाळ येथे 18 ते 22 फेब्रुवारीला होणार खुली क्रिकेट स्पर्धा
नवप्रभात NEWS / कुडाळ
प्रिन्स क्रिकेट क्लब, समादेवी मित्रमंडळ (कुडाळ) व श्री कलेश्वर मित्रमंडळ (नेरुर) यांच्या संयुक्त विद्यमाने खुली डे-नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयानजीकच्या क्रीडा संकुल मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांक दीड लाख रु., द्वितीय ७५ हजार रु. व प्रत्येकी चषक, उपांत्य सामना पराभूत संघ २५ हजार रु. तसेच मालिकावीर ७,९९९ रु. व एअर फ्रायर, अंतिम सामना सामनावीर ५,५५५ रु. व मिक्सर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक व क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ३,५५५ रु. अशी पारितोषिके तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी भेटवस्तू देण्यात येणार आहे. ही स्पर्धा लिग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. संधांनी नावनोंदणी सुनील धुरी, मोबा-९४२१२६१३०० किंवा सचिन कांबळी यांच्याकडे करावी,
Post a Comment
0 Comments