हरीत सेना अतिउत्कृष्ट शाळा म्हणून वेंगुर्ल्यातील अणसूर पाल हायस्कूलचा गौरव
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा सिंधुदुर्ग अंतर्गत,हरितसेनेचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्ह्यातील २५ अतिउत्कृष्ट शाळांचा श्री.राजेंद्र मगदूम विभागीय वनअधिकारी, महाराष्ट्र वन सेवा यांच्याहस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे शासकीय कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी अणसूर पाल हायस्कूल , अणसूर तालुका वेंगुर्ला या शाळेच्या हरित सेना व इको क्लब अध्यक्ष पल्लवी गावडे व विद्यार्थी मंडळ यांनी मार्गदर्शक विजय ठाकर व संचिता परब यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी वनस्पतीबाग जतन व संवर्धन, परसबाग निर्मिती, एक पेड माॅं के नाम २.० , वृक्षलागवड, विविध प्राणी पक्षी वनस्पती व किटक - वनसंपदा माहितीपटाद्वारा प्रबोधन जागृती, पक्षी जगत रांगोळी प्रदर्शन आदी उपक्रम राबवून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेला सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदर सन्मान मुख्याध्यापक श्री.राजेश घाटवळ , इको क्लब मार्गदर्शक विजय ठाकर यानी स्विकारला.यावेळी सहाय्यक वनक्षेत्रपाल वर्षा कोळेकर, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण वेंगुर्लाचे लक्ष्मण पोतदार, तसेच वेंगुर्ला वनपाल दिप्ती मौर्ये, वनसंरक्षक ऋतुजा कदम व प्रमोद कदम मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments