वेंगुर्ले येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील एन. सी. सी.विभागाच्या वतीने अतिशय उत्सहात केला एन. सी सी.डे साजरा.....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी 58 महाराष्ट्र बाटलीयन एन. सी. सी. सिंधुदुर्गचे सुभेदार बेनुदर साहू, हवालदार प्रदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. धनराज गोस्वामी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे सुभेदार बेनूदार साहू यांनी एन. सी. सी. मध्ये कॅडेट्सना शासकीय नोकरीत असणाऱ्या विविध संधीबद्दल मार्गदर्शक केले. तसेच श्री.हवलदार प्रदीप पाटील यांनी कॅडेट्सनी स्थानिक भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेवरसुद्धा प्रभुत्व मिळवले पाहिजे. तर शिस्त, राष्ट्रप्रेम, निस्वार्थ सेवा इत्यादी गुण सहज रित्या कॅडेट्स मध्ये रुजवण्याचे काम एन. सी. सी. मध्ये केले जाते असे प्रतिपादन केले. तसेच अध्यक्षीय भाषण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी म्हणाले की, मी एन. सी. सी. कॅडेट नसतो तर प्राचार्य झालो नसतो त्यामुळे प्रत्येक कॅडेट्सनी एन. सी. सी. मध्ये कार्यरत असताना राष्ट्रीय कॅम्प मध्ये सहभागी होऊन स्वतःचे व्यक्तीमत्व विकसित करून स्वतःसोबत समाज व देशाचा विकास करण्यास मदत करण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. एम. पाटोळे आणि प्रा. एल. बी नैताम यांनी एन. सी. सी. कॅडेट्सना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट डॉ. बी. जी. गायकवाड यांनी केले. तर आभार कॅडेट संजना चव्हाण यांनी मांडले तसेच सिनियर अंडर ऑफिसर हर्षद हरमळकर आणि चैतन्य तुळसकर यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदरील कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. एम. आर. नवत्रे, प्रा. बी.एम. भैरट, स्टाफ सेक्रेटरी प्रा.विवेक चव्हाण आणि एन. सी. सी. कॅडेट्स उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments