दशावतार स्त्री कलाकार रमेश शिरोडकर यांनी साकारलेली अर्जुनाची भुमीका ठरली लक्षवेधी
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांचा काल सोमवारी बावळाट येथे विर अभिमन्यु हा नाट्यप्रयोग सादर झाला.या नाट्यप्रयोगात उत्कृष्ट स्त्री भुमीका साकारणारे मळगांव गावचे सुपूत्र तथा दशावतार कलावंत रमेश शिरोडकर यांनी प्रथमच पुरूषपात्र म्हणजेच अर्जुन ही भुमीका साकरली.विशेष म्हणजे त्यांची ही भुमिका पुर्ण अभ्यास पुर्वक होती.त्यांच्या या भुमीकेला साजेल अशी त्यांची वेशभुषा, रंगभुषा व उत्तम सवांदफेक कौतुकास्पद ठरली. यावेळीजरा सुद्धा भासल नाही की हा कलाकार स्त्री भुमीका साकारणारा आहे.खरतर एवढी वर्षे स्त्री पात्र करत असताना एक राजपात्र करणे सोपे नाही पण काम दशावतारात काम करण्याची आवड असल्याचे दशावतार कलावंत रमेश शिरोडकर यांनी हे आव्हान पेलवून ही भूमिका करण्याचे ठरवले अभिमन्यू या पात्राचा पूर्ण अभ्यास केला त्यामूळे त्यांना ही बाजी मारता आली. खरोखरच या भुमिकेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ह्या भूमिके मुळे त्यांच्या कलेवर प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग चाहते आणि मित्र मंडळींनी कौतुक केले आहे.वीर अभिमन्यू ही भूमिका त्यांच्या जीवनात सुंदर आणि कौतुकास्पद ठरली आहे.
रमेश शिरोडकर यांनी साकारलेल्या या भुमिकेसाठी दशावतार क्षेत्रात कार्यरत असताना अर्जून आणि त्याच्या सारख्या विविध वीर पुरुषांच्या भूमिका अनेक नाटकात साकारलेले दशावतार कलावंत तसेच सध्या दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ येथे कार्यरत असलेले दत्तप्रसाद शेणई आणि जय हनुमान दशावतार नाट्य मंडळात कार्यरत असणारे सहकलाकार
गौरव शिर्के व संजय काळे यांनी योग्य असे मार्गदर्शन केले.रमेश शिरोडकर यांनी या तिनही दिग्गज कलाकारांसहित आपले चाहते प्रेक्षक,सर्व सहकलाकार व संगीत साथ तसेच मालक यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment
0 Comments