न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची निधी चित्रकलेत प्रथम तर अमृता वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टाक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी निधी यशवंत पेडणेकर हिने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं
तर सावंतवाडी तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावरकरांचे विविध पैलू या विषयावर भाष्य करताना इयत्ता नववीच्या अमृता दत्ताराम नवार हिने द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारली.
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची ही यशाची पंरपरा कायम राखत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आणि चित्रकला स्पर्धेत यश मिळवत शाळेच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशस्वी विद्यार्थ्यांना या प्रशालेचे उपक्रमशिल अध्यापक प्रा.वैभव खानोलकर आणि लिपिक अजित केरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.
या विजेत्या स्पर्धकांचे विशेष अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत -आडारकर
उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले ,सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध निवेदक तसेच मुलाखतकार,
उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्या सह लिपिक अजित केरकर व या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही विशेष अभिनंदन केले आहे
सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे
Post a Comment
0 Comments