Type Here to Get Search Results !

माऊली अवतार प्राप्ती दिन सोहळा उद्यापासून


माऊली अवतार प्राप्ती दिन सोहळा उद्यापासून

  मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा-वालावल येथील माऊली मंदिर येथील देवी माऊली अवतारखाप्ती दिन सोहळा दि. १० व ११ मार्च रोजी होणार आहे. १० रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधींना प्रारंभहोईल. नंतर देवी अथर्वशीर्ष स्वाहाकार प्रारंभ, दुपारी आरती व नैवेद्य, ३ वाजता एकनाथ जगन्नाथ वालावलकर यांच्या स्मरणार्थ 'स्वरांजली ग्रुप' च्यावतीने भावगीत-भक्तीगीत मैफल होईल. दि. ११ रोजी देवी अथर्वशीर्ष स्वाहाकार, सकाळी ११ वाजता पूर्णाहुती व गावराठीचे गाऱ्हाणे, १२ वाजता आरती, १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महाप्रसाद व रात्री ९ वाजता आरोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.

Post a Comment

0 Comments