Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील उमेदवारांना बेरोजगार उमेदवारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे.
या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत पात्र उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेट देऊन समन्वयक प्रीतेश परब, सिद्धेश घाडीगावकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे

Post a Comment

0 Comments