Type Here to Get Search Results !

चेंदवण पडोस प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


चेंदवण पडोस प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

चेंदवण पडोस प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सव वर्ष पुर्तीच्या निमित्ताने येत्या ७ ते९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात , बाल दशावतार नाट्य मंडळांचा जिल्हास्तरीय नाट्य महोत्सव होणार आहे.
यात ७ व८ मार्च रोजी सायंकाळी ६ ते रात्रौ ११ वेळात , एक- एक तासात स्पर्धेतील बाल दशावतार नाट्ये सादर होतील.
यात, रांगणातुळसुली, कुणकावळे, माडयाचीवाडी, तर ८ मार्च रोजी सायंकाळी, कुडाळ, दोडामार्ग, डिगस, नांदोस या गावातील बालनाट्य स्पर्धकाची नाटकं सादर होतील.
रविवार ९ रोजी सहा वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धा चेंदवण माऊली शाळेच्या रंगमंचावर सादर होतील.
त्यानंतर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक सादर होईल. याचा लाभ घ्यावा असे आवाहन चेंदवण शाळा अमृत महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments