Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूतपूर्व फेडरेशन रेफरी व क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक दाभोलकर मेस्त्री यांचा पालघरमध्ये सन्मान


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूतपूर्व फेडरेशन रेफरी व क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक दाभोलकर मेस्त्री यांचा पालघरमध्ये सन्मान 

नवप्रभात NEWS / मुंबई 

      रंजन क्रीडा मंडळ, देवाळे, वसई, पालघर आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेचे औचित्य साधून श्री. दिपक सावंत ( सचिव मुंबई शूटिंगबॉल) व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूतपूर्व फेडरेशन रेफरी व क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक दाभोलकर मेस्त्री ह्यांना पूर्वीचे ठाणे व विद्यमान पालघर जिल्हात केली तीन दशके शूटिंगबॉल खेळाचा प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या सेवेबद्दल प्रमुख पाहुणे मा.श्री.सुदेशजी प्रभाकर चौधरी - वसई तालुका प्रमुख (शिवसेना बाळासाहेब ठाकरे) ह्यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी व्यासपिठावर मा. श्री. ओनिलजी जॉन आल्मेडा (संचालक,बसीन कॅथोलिक को ऑप. बँक लि.), मा. श्री. नरेंद्र रघुनाथ राऊत (अध्यक्ष,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ, वसई), मा.श्री.सुरेश प्रभाकर वर्तक ( कार्यकारी विश्वस्त,सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ), दिपक सावंत ( सचिव- मुंबई शूटिंगबॉल) आदी मान्यवर उपस्थित होते.
    ह्या स्पर्धेत डायरेक्ट शूटिंगबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय कदम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या व सिंधुदुर्ग जिल्हाचा नामवंत खेळाडू रिकी नेमण ह्याच्या नैतृत्व लाभलेल्या सिंधुदुर्ग संघानी उल्लेखनीय खेळ करीत स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला तर खालील संघानी अनुक्रमे १) जयंत घोरपडे स्पोर्ट्स टेंबुर्नी, सोलापूर, २) इस्तियाक- मालेगांव, नाशिक, ३) कै. राधा दामोदर, अलिबाग, रायगड, ४) संजय भोसले प्रतिष्ठान, माळशिरस, सोलापूर पटकावले. ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ नामवंत संघानी भाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments