वायंगणी ग्रामपंचायत येथे महिला दिनानिमित्त 9 व 10 मार्च रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
स्त्री रोग, बालरोग, त्वचा रोग, गुप्तरोग, हृदय रोग, मधुमेह तपासण्या केल्या जाणार आहेत
या शिबिरासाठी डॉ.अजेय शिंदे एम. डी. (बालरोग तज्ज्ञ डि.सी.एच.डि. व्ही.डि. (त्वचा रोग व गुप्त रोग तज्ज्ञ) मुंबई
डॉ. माया शिंदे एम.डी. (स्त्री रोग तज्ज्ञ) मुंबई
डॉ. हर्षदा डिंगणकर एम. डी. हृदय रोग तज्ज्ञ (मधुमेह तपासणी) जनरल फिजिशियन पुणे
शार्दुल डिंगणकर (US) हृदय रोग शैल्य विकारक
श्री पुष्कर डिंगणकर (B.pharm) फार्मासिस्ट पुणे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे
सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी दुपारी ठिक ०३.०० वाजता गावातील महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात येणार असून त्यासाठी तृणधान्य वापरून पदार्थ बनविणे हा विषय ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला मिक्सर,व्दितीय क्रमांक विजेत्याला कुकर,तृतीय क्रमांक विजेत्याला नॉनस्टिक कढई अशी बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.
सायंकाळी ठिक ५.०० वाजता महिलांसाठी फनी गेम स्पर्धा घेण्यात येणार असून प्रथम क्रमांकास आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ बक्षिस वितरण समारंभ होईल त्यानंतर ७ वाजता महिलांचे सामुहिक नृत्य सादरीकरण होणार आहे. ७.३० वाजता महिलांचे खास आकर्षण होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे यामध्ये प्रथम क्रमांकास पैठणी,व्दितीय क्रमांक सोन्याची नथ,तृतीय क्रमांक साडी अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी वायंगणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांना वायंगणी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावेत असे आवाहन वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments