हुमरमळा(वालावल) येथे २५ रोजी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
इनर व्हील क्लब ऑफ कुडाळ व जिल्हा सामान्य रुग्णालय,सिंधुदुर्ग ओरोस, यांच्यातर्फे येत्या मंगळवार, दिनांक 25 फेब्रुवारी रोजी हुमरमळा येथे, मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
लक्ष्मी नारायण हॉल, हुमर मळा(वालावल), येथे आयोजित सदर शिबिरात, सकाळी 9 ते २.०० या वेळेत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
या आरोग्य शिबिरा मध्ये.स्त्रीरोग तपासणी, कर्करोग तपासणी (मुखाशयाचा,स्तनाचा, गर्भाशयाचा.)
.बीपी शुगर च्या ब्लड टेस्ट ,सांधे व स्नायूंचे आजार आदी तपासणी करण्यात येणार आहे.
सदर शिबिरा साठी स्त्रीरोगतज्ञ म्हणून. डॉ समृद्धी कांबळे, डॉ विश्वास लक्ष्मण,(फिजिओथेरपिस्ट) . डॉ. चैताली प्रभू आदी तसेच नर्स, उपस्थित राहणार आहेत.
तपासणी नंतर आवश्यक औषधे ही रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत.
वरील शिबीराचा लाभ गरजुंनी घ्यावा, अशी आवाहन इनर व्हील क्लब ऑफ़ कुडाळ च्या अध्यक्ष
संजना काणेकर व सचिव वैशाली पडते , यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी तसेच आगाऊ नाव नोंदणी साठी, हुमरमळा ग्राम पंचायत सदस्य बारीश उपाध्ये, पत्रकार मनोज देसाई, शेखर परब आदींकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments