दशावतार लोककलेसाठी प्रा. खानोलकर यांनी दिलेलं योगदान निश्चितच गौरवास्पद - संतोष वायंगणकर
'एक समृद्ध लोककला दशावतार' पुस्तकाचे वेंगुर्ल्यात शानदार प्रकाशन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
'एक समृद्ध लोककला दशावतार' या दशावतार लोककलेवरच्या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकशन वेंगुर्ले येथील दुसऱ्या अखिल दशावतार नाट्य संमेलनात मोठ्या थाटात पार पडले. यावेळी प्रकाशन सोहळ्यात दै. प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांनी वैभव खानोलकर यांनी केलेल्या संशोधनात्मक लिखाणाबद्दल कैतुक केले. वैभव खानोलकर यांचं खूप मोठं योगदान दशावतार लोककलेला आणि दशावतार कलावंतांना न्याय देण्यासाठी राहिलेला आहे, अशा भावना व्यक्त करताना ते सातत्याने दशावतार लोककले बरोबरच विविध विषयांवर लिखाण करत असतात त्यांच्या लिखाणातून वेगवेगळे विषय सातत्याने वाचायला मिळतात. विशेष म्हणजे भजन आणि दशावतार हे सिंधुदुर्गाच्या आवडत्या लोककला आहेत. या दोन्ही विषयावर 'प्रहार'च्या माध्यमातून मुलाखत सत्राचे आयोजन केले गेले. या सगळ्या मुलाखत सत्राचे मुलाखतकार म्हणून वैभव खानोलकर यांनी सातत्यपूर्ण मुलाखत घेतल्या याबद्दलही त्यांचे अभिनंदन. त्यांच्याकडून दशावतारासाठी जे लिखाण झालं ते भावी पिढीसाठी निश्चितपणे महत्त्वाचे कार्य ठरेल असेही त्यांनी सांगितले.
वेगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात हा पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संतोष वायंगणकर यांच्यासह पुत्तकाचे लेखक प्रा. वैभव खानोलकर, संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक भाईडकर, ज्येष्ठ लेखिका सौ. वृंदा कांबळी, पत्रकार शेखर सामंत, देवदत्त परुळेकर, युवा भालचंद्र केळुसकर,कलादान पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार यशवंत तेडोलकर, मार्ज समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, गोवा येथेल 'सप्तसूर'चे संस्थापक विजय केरकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, रांगोळीकार रमेश नरसुले, एम.पी. मटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रा. खानोलकर यांचे पुस्तक दशावताराची उंची वाढवणारे डॉ. अशोक भाईडकर
प्रा. वैभव खानोलकर यांनी आपल्या पुस्तकात विविध दाखल्यांचा आणि विविध पुराव्यांच्या आधार घेत दशावतार या मातीतील लोककला हे सिद्ध करत अनेक कानडीप्रेमी लोकांना जागा दाखवून दिली आहे. मी संशोधन करताना बाराव्या शतकापर्यंत अभ्यास केला. पण खानोलकर मात्र ही लोककला सहाव्या शतकात असल्याचे पुरावे देतात. माझ्यानंतरचे त्यांनी केलेले अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार लिखाण निश्चितपणे दशावताराची उंच वाढवणारे आहे, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. अशेक भाईडकर व्यक्त केले. यावेळी पत्रकार शेखर सामंत, ज्येष्ठ लेखिका वृंदा कोवळी यांनीही विचार व्यक्त केले.
शिक्षक भारती संघटना एक समृद्ध लोककला दशावतार या पुस्तकाच्या वितरणासाठी कट्टीबध्द असल्याचे प्रशांत आडेलकर, अध्यक्ष शिक्षक भारती, सिंधुदुर्ग यांनी सांगितले. दम्यान वैभव खानोलकर यांचे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या. यात कुडाळचे स्वरूप सावंत, राजेश महाडेश्वर, बाबु जोशी आरोंदा, प्रसाद परब गोवा यांसह दशावतारी कलावंत उदय राणे कोनस्कर, जानु वरख, दत्तप्रसाद शेगई, नारायण आसियेकर, अमित मोचेमाडकर, बावा कामत, अनिल कामत, मयुर गवळी, हरेश नेमळेकर, पप्पू नांदोस्कर, महेश गवंडे, तुकाराम गावडे, ओमप्रकाश चव्हाण यांसह अनेक कलावंतानी या पुस्तकाबद्दल प्रा. वैभव खानोलकर अभिनंदन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मतोंडकर तर प्राप्ताविक प्रा. सचिन परळकर यांनी केले.
Post a Comment
0 Comments