कुडाळ येथील श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिन सोहळ्यास आज पासून प्रारंभ
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ येथील श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापनेचा २७ वा वर्धापन दिन सोहळा गुरूवार, दि. ०६ फेब्रुवारी व शुक्रवार, दि. ०७फेब्रुवारी २०२५ (माघ शु. ९, शके १९४६ ते माघ शु. १० शके १९४६) या कालावधीत श्रद्धेने व भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे.
पहिल्या दिवशी गुरूवार, दि. ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते १२ वा. चित्रकला स्पर्धा (पहिले ते दुसरी व तिसरे ते चौथी मुलांसाठी मर्यादित) दुपारी ३ ते ४ वा. लहान मुलांच्या स्पर्धा व कार्यक्रम सांय. ४.३० वा. महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रम सांय.७.०० वा. श्रींची आरती रात्रौ. ८ ते ९ वा. जादूगार यशराज यांचे जादूचे प्रयोग खास आकर्षण रात्रौ ९.०० वा. खेळ पैठणीचा अयोध्या श्रीराम सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा त्यानंतर पुष्पा २ कालिमाता देखावा झाल्यावर चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी यांचा नृत्यविष्कार होणार आहे
दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२५
सकाळी ६.३० ते ८. वा. नामस्मरण व श्रींची नित्यपुजा
दुपारी ८ ते १२ वा. लघुरूद्र दुपारी १२.०० वा. महाआरती दुपारी १२.३० ते ४.३० वा. महाप्रसाद
सायं. ५ ते ६ वा. हरिपाठ (सद्गुरू श्री वामनराव पै)
सायं. ७.०० वा. श्रींची आरती रात्रौ ८ ते ९.३० वा. श्रींची पालखी मिरवणूणक रात्री ९.३० ते १०.३० वा. सुश्राव्य भजन श्री ब्राम्हणदेव मित्रमंडळ, कुडाळ रात्रौ. ११.०० वा. खानोलकर पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा लग्नाआधी बाप हा महान नाट्यप्रयोग
सादर होणार आहे तरी भाविकांनी या सोहळ्या उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गवळदेव मित्रमंडळ, कुडाळ यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments